साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 15 मार्च 2020
श्रीरामपूर |श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे प्रवरा नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळू उपसा चालू असल्याचे दिसत आहे. नदीपात्रालगत ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. महसूल प्रशासनाला आर्थिक मलिदा भेटत असल्यामुळे प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. प्रवरा नदीपात्रातील रात्रीचा अवैध वाळु उपसा त्वरित बंद करावा ; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.
नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाळूतस्करी होत असताना महसूल व पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. महसूल प्रशासन व वाळूतस्कर यांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून वाळूतस्करीचा होत असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे.
महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या दावणीला बांधले गेले असल्यामुळे वाळू तस्करांवर महसूल प्रशासनाचा वचक राहिला नाही. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू तस्कारांकडून खूलेआम वाळू लूट केली जात आहे. तस्कारांनी प्रवरा नदीपात्रात कडेला मोठेमोठे खड्डे पाडले आहेत. वाळूतस्कारांनी मोठया प्रमाणावर वाळू उपसाली आहे. नदी पात्रातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, संपत्तीची चौकशी करावी, प्रवरानदीपात्रातील रात्रीचा अवैध वाळु उपसा बंद करावा ; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.
Tags
ताज्या घडामोडी