![]() |
घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्ड कडून घेण्यात येणाऱ्या १० वी बोर्डाची परिक्षा शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात सुरू झाली आहे |
साईकिरण टाइम्स ब्युरो |6 मार्च 2020
नेवासा |दादा दरंदले| नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्ड कडून घेण्यात येणाऱ्या १० वी बोर्डाची परिक्षा शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात सुरू झाली आहे.
नेवासा तालुक्यात एकूण १४ परीक्षा केंद्र असून १४ परीक्षा केंद्रावर एकूण ६९०२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण ४३३ विध्यार्थी परीक्षा देत असून त्यात २ विद्यार्थी दिव्यांग आहे त्यांना बोर्ड च्या नियमानुसार आम्ही ३० मि वेळ वाढवून देत आहोत असे विद्यालयाच्या प्राचार्य सौ शेरकर यांनी सांगितले. तसेच परीक्षा कालवाधित विद्यालय व परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोनई पोलीस स्टेशनचे पीआय जनार्दन सोनवणे व त्यांचे पथक दक्ष आहे.