साईकिरण टाइम्स ब्युरो | भरत थोरात
उक्कलगाव / बेलापूर | दि. 11 मार्च 2020
श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर प्रवरा परिसरातील शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेती व्यवसायाबरोबरच पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेला आहे ; मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना हा रोग कोंबड्यांपासून होत असल्याच्या अफवेने पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
कोरोना रोगांची चुकीची माहिती पसरली जात आहे त्यामूळे चिकन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे चिकन व कोरोनाचा कुठलाही प्रकारचा संबध नसतानाच चिकन खालल्याने आजार होत नाही हे सरकारने स्पष्ट केले असून किरकोळ चिकन व्यवसायावर ९० टक्के परिणाम झाला असून त्यामूळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे
------ सिराज कुरेशी (चिकन विक्रेते बेलापूर बुद्रुक, तालुका श्रीरामपूर )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांच्यामूळे पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असून पोल्ट्रीधारक शेतकर्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.
--------अभिषेक खंडागळे ( पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी / बेलापूर बुद्रुक, तालुका श्रीरामपूर )
शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. कोंबड्यांची मागणी घटल्याने पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी अडचणीत सापडला आहे कोरोना रोगामूळे ग्राहकांनी किरकोळ चिकन व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे कोरोना रोग कोबंड्यापासून होत अफवेने पोल्ट्री व्यावसायिक शेतकर्यांला मोठा तोटा सहन करावा लागत आहे सध्या तरी कोबंडी व अंडे घेण्यास ग्राहक कमी झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे.सध्यातरी मागिल भाव प्रमाणेच सध्याच्या भावात कमालीची घट झाली आहे. कोरोना रोगामुळे चिकन व्यवसायात घट झाल्याने शेती जोडधंदा असणार्या शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. चिकन व्यवसायात कमालीची घट असतानाच कुक्कुट पक्षी व कोरोना विषाणूचा संबध नाही असे पशुसंवर्धन आयुक्तालयांकडून सांगण्यात आले.आर्थिक संकटात सापडलेल्या कर्ज असणार्या शेतकर्यांच्या मध्ये कर्ज फोडावे तरी कसे या द्विवीदेत शेतकरी आणखी संकटात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या बेलापूरच्या आठवड्याबाजारात १०० रूपयांत ३ कोबंड्या विकत असल्याने पारंपारिक पद्धतीने चिकन व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारामंध्ये चिंतेत भर पडली होती.
Tags
प्रादेशिक