साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 12 मार्च 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर येथे ओव्हरब्रिज जवळ ट्रक चालकांना लुटण्याच्या बेतात असणाऱ्या टोळीला बुधवारी ( दि. 11) दुपारी शहर पोलीसांनी पकडले. पकडलेल्या 6 जणांवर विविध कलमांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून स्प्लेंडर मोटारसायकल, लोखंडी तलवार, कत्ती, मिरची पावडर, नायलॉन दोरी, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले.
शहर पोलीस स्टेशन हद्दीत फरार तसेच वॉरंटमधील आरोपींचा कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शोध घेत असताना काही लोकं कांदा मार्केट परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या ट्रक चालकांना लुटण्याच्या बेतात ओव्हरब्रिजजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ; पोलीस तेथे आल्याची चालूल लागताच काहीजण मोटारसायकल घेऊन सोडून पळून जाऊ लागताच पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून 6 जणांना पकडले. हे आरोपी श्रीरामपूर शहर व कांदा मार्केट पासून जाणारे ट्रक चालकांना लुटण्याच्या व दरोडेखोरासारख्या गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत एकत्रितरित्या जमा झाल्याची खात्री पटल्याने किरण जगन्नाथ चिकणे उर्फ बटल्या ( वय 24 रा. कांदा मार्केट ) सागर राजू त्रिभुवन ( वय 23 रा. कांदा मार्केट ), आकाश दिनकर सौदागर ( वय 23 रा. सिद्धार्थ नगर ), कुर्बान इस्माईल शेख ( वय 24 रा. वॉर्ड नं 2), अक्षय हिराचंद त्रिभुवन ( वय 22 रा. गोंधवनी ), लहू शशिराम निकम ( वय 20 रा. जातेगांव ता. वैजापूर ) यांच्यावर विविध कलमांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सपोनि समाधान पाटील, पोसई संभाजी पाटील, समाधान सुरवाडे पोहेकॉ संतोष बहारकर, सुरेश मुसळे, जालिंदर लोंढे, पोना रवींद्र कोरडे, सोमनाथ गाडेकर, संजय दुधाडे, रघुवीर कारखेले, पोकॉ संतोष दरेकर, रमीजराजा आतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Tags
क्राईम