साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 12 मार्च 2020
श्रीरामपूर | राहता तालुक्यातील नांदूर येथील पाणी पुरवठा विहिरीजवळ तसेच इतर ठिकाणा वरुन मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन झाले असून सदर व्यक्तीने शासनाची कोणतीही पूर्व परवानगी किंवा रॉयल्टी न भरता बेकायदेशीर उत्खनन केलेले आहे, असे छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे यांनी राहता तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन पत्रात नमूद केले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, संदर्भिय पंचनाम्याच्या अनुशंगाने विशाल गोरे यांच्याकडून झालेल्या प्रकारा बाबत 8 दिवसाच्या दंड वसूल करून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा . अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने मोठे आंदोलन छेड़न्यात येईल, असे छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे यांनी राहता तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.
Tags
ताज्या घडामोडी