![]() |
श्रीरामपूर : शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. |
साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 12 मार्च 2020
श्रीरामपूर | अखिल भारतीय सेना व छत्र युथ फौंडेशन यांच्या वतीने शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (दि. 12) शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी 'शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मागील 14 वर्षापासून शिवाजी चौकात शिवजयंती उत्सव साजरा केला जात असल्याचे छत्र युथ फौंडेशनचे संस्थापक इम्रान शेख यांनी सांगितले. पोलिसांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अखिल भारतीय सेनेचे तालुकाध्यक्ष इम्रान शेख, साईकिरण टाइम्सचे कार्यकारी संपादक हरीश शिंदे, छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कोल्हे, अखिल भारतीय सेनेचे शहर उपाध्यक्ष योगेश गायकवाड, उद्योजक विजय शिर्के, अलोक थोरात, साईकिरण टाइम्सचे सहसंपादक राहुल क्षीरसागर, साईकिरण टाइम्सचे संपादक राजेश बोरुडे, शहराध्यक्ष विजय कावरे, खैरीनिमगांवचे ग्रामपंचायत सदस्य अंकुश पवार, लखन जाधव, महेश छतवणी, ललित खैरनार, विशाल थोरात, सचिन काळे, हेमंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.