नेवासा : बँन्डच्या सुरांनी रंगली रात्र;मांगिर बाबा यात्रौत्सव संपन्न.



साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 12 मार्च 2020
नेवासा |दादा दरंदले | नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे मांगीर बाबा यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. सकाळी गंगेच्या पाण्याने देव मांगिरबाबास गंगास्नान झाले. सकाळी नऊ वाजता श्री मांगीरबाबास नैवद्य व ग्रामदैवत श्री घोडेश्वरी मातेस चोळीपातळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

                 यात्रेनिमित्त अबाल-वृद्ध यांनी देव श्री मांगिरबाबा चे दर्शन मोठ्या मनोभावे घेतले. श्री मांगिरबाबा मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. खेळणी,मिठाई चे दुकाने मोठ्या दिमाखात उभी होती. सायंकाळी ६ वाजता अभिषेक,पूजा संपन्न झाली.त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनिल भाऊ गडाख यांनी भेट दिली. त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या नामांकित बँन्डची  जुगलबंदी यात्रेकरूस पहावयास मिळाली.धुलीवंदनाच्या दिनी ती रात्र अगदी सुरांनी रंगली होती सरस्वती ब्रास बँन्ड, चाऊस ब्रास बँन्ड, श्री कृष्ण ब्रास बँन्ड, अमर ब्रास बँन्ड यांनी जुने व नवीन मराठी,हिंदी गाणी सादर केली. महाराष्ट्रभरातून पाहुण्यांनी ब्रास बँन्ड ऐकण्यासाठी श्री मांगीरबाबा यात्रेत हजेरी लावली होती.

             बुधवार रात्री यात्रेच्या निमित्त जळगाव खानदेश येथील आनंद लोकनाट्य तमाशा मोफत दाखवण्यात आला.लोकनाट्य तमाशा बघण्यासाठी तमाशा-रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यात्रेच्या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोनई पोलीस स्टेशनचे पीआय जनार्दन सोनवणे व त्यांचे पोलीस कर्मचारी बाबा वाघमोडे,दत्तात्रय गावडे,किरण गायकवाड,गणेश आढगळे यांनी चोख बंदोबस्त दिला. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post