साईकिरण टाइम्स ब्युरो | 5 मार्च 2020
सात्रळ |बाबासाहेब वाघचौरे | राहुरी तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायच्या वतीने अपंग कल्याण निधीतून दरवर्षी विविध संसारपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते. यावर्षीही गावातील सुमारे तीस दिव्यांग बांधवाना धनादेशाचे वाटप प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित व्हा चेअरमन विश्वासराव कडू, संचालक सुभाष अंत्रे, उत्तमराव दिघे, बाबुराव पलघडमल, अपंग कर्मचारी संघटनेचे साहेबराव अनाप,सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप,पंचायत समिती सदस्य वैशाली अंत्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सहकारी तत्वावरील आशिया खंडातील पहिला साखर कारखना असा नावलौकिक असणारा प्रवरा सहकारी साखर कारखान्यात बिनविरोध निवड झाल्याने नवनिर्वाचित व्हा चेअरमन तसेच पंचक्रोशीतील संचालकांचा नागरी सत्कार सोनगाव ग्रामपंचायत, सोनगाव सोसायटी तसेच ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र अनाप सरपंच अनिल अनाप व उपसरपंच किरण अंत्रे यांनी तर ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्राम विकास अधिकारी थोरात साहेब व रविंद्र ताजने साहेब यांनी तसेच राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा शिक्षक बँकेचे मा चेअरमन साहेबराव अनाप यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वासराव कडू हे होते. अध्यक्षीय भाषणात सत्काराला उत्तर देताना कडू म्हणाले की, मी जसा पहिला होतो तसाच याही पुढे राहील आ. राधाकृष्ण विखे पा व खासदार सुजयदादा विखे पा यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी नक्कीच सार्थकी लावील. तसेच हा माझ्या सन्मान माझ्यासाठी फार मोलाचा असून सभासदांच्या विविध अडचणी मार्गी लावू बोलताना त्यांना त्यांचे जिवलग मित्र व सोनगावच्या राजकीय कारकिर्दीतील एक तारा कै.अरुण अनाप यांची यावेळी आठवणी जागृत झाल्या.
या प्रसंगी विनोद अंत्रे,प्रशांत अंत्रे,सलीम तांबोळी,शामराव अंत्रे,ढूमने साहेब,एजाज तांबोळी,संदीप अनाप,कैलास भोत,शरद अंत्रे,न्हन्नु भाई पिंजारी, शकूर तांबोळी,हाजी मौलाना,सुभाष शिंदे,सूर्यभान शिंदे,ज्ञानदेव अंत्रे,धोंडू वाकचौरे,तसेच दिव्यांग बांधव ,ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र अनाप यांनी तर विश्वासराव कडू उत्तम दिघे,अन्सार तांबोळी,चंद्रभान अनाप ,रविंद्र ताजने,साहेबराव अनाप या मान्यवरांची मनोगत मांडण्यात आले.सूत्रसंचालन शामराव अंत्रे यांनी केले तर आभार मा. उपसरपंच किरण अंत्रे यांनी मानले.