१४ एप्रिलला भीमजयंती घरातच साजरी करावी ; सुरेंद्र थोरात
साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 मार्च 2020
देवळाली प्रवरा : १४ एप्रिल रोजी होणारी भीमजयंती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार घरी थांबूनच घरातच साजरी करूया, असे आवाहन आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी आज दि.२७ मार्च रोजी केले आहे.
संपूर्ण जगभर कोरोना रोगाने थैमान घातले असल्याने सरकारने संचारबंदी लागू केली आहे. कोरोनोमुळे आपण घराबाहेर पडू नये व स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. १४ एप्रिल रोजी भीमजयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो; परंतू यंदा कोरोनाच्या संकटामुळे आपापल्या घरातच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा करावा असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांनी केले असून त्यांचा आदेश प्रमाण म्हणून उत्तर नगर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांनी घराबाहेर न पडता घरातच भीमजयंती साजरी करावी, असे सुरेंद्र थोरात यांनी म्हंटले आहे.