सोनईत गोल्डन मेमरीज ग्रुपच्या पुढाकाराने एकाच दिवसात 56 नागरिकांचे रक्तदान.
सामाजिक भान जपत ग्रुपचा उपक्रम
साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 मार्च 2020
सोनई | दादा दरंदले | गोल्डन मेमरीज ग्रुप सोनई व सोनई ग्रामपंचायत ,अशोका ज्ञानदीप ग्रामीण बहुउद्देशीय संस्था सोनई यांचे संयुक्त विद्यमाने देशभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बुधवार दि 25 मार्च 2020 रोजी सोशल मीडियातून व व्हॉटसअप ग्रुपवरून आवाहन करत भव्य रक्तदान शिबिराचे सोनई येथे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शनैश्वर विद्या मंदिर सोनई इयत्ता दहावी वर्ष 1988 व 89 च्या गोल्डन मेमरीज ग्रुपने पुढाकार घेतला होता.सदर रक्तदान शिबिरात सोनईमधील व्यापारी,पोलीस (गृह)खात्यांचे अधिकारी,नोकरदार ,महिला,सर्वसामान्य नागरिक, तरुण,विद्यार्थी आदींनी सहभागी होत रक्तदान केले.
या रक्तदान प्रसंगी सर्व स्वयसेवक ,डॉक्टर्स ,रक्तदाते यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाळगत आपली जबाबदारी पार पडली.विशेष म्हणजे रक्तदानास आलेल्या रक्तदात्यांनी सुमारे एक तास वेटिंग करत सोशियल डिस्टसिंग सारख्या महत्वाच्या नियमांचे पालन करत रक्तदान केले जे इच्छुक रक्तदाते काही कारणास्तव रक्तदान करण्यासाठी येऊ शकले नाही त्यांनी ज्यांना शक्य असेल अश्यांना रक्तदान करण्याचे आवाहन भ्रमणध्वनी,सोशल मीडिया या माध्यमातून रक्तदानाचे आवाहन करत ग्रुप सदस्यांना सहकार्य केले.गोल्डन ग्रुप सदस्य तथा सेवानिवृत्त सैन्यदलातील सैनिक व सध्या मुळा एज्युकेशन सोसायटी येथे सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मेजर पराजी तागड यांनी वयाच्या 46 व्या वर्षी 46 व्या वेळा रक्तदान करण्याचा अनोखा विक्रम केला सैन्यदलात असतांना देखील आर्मी दिवस,आर्मी स्थापना दिवस ,बटालियन वाढदिवस असे रक्तदान ते वर्षातून दोनदा तीनदा करायचे.दिवसभरात एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदात्यांना समाधान भेळ सेंटर सोनई यांच्यावतीने सामाजिक भान जपत बिस्कीट पुडे व पाणी बॉटल यांचे वाटप स्वतःहून केले.अर्पण व्हॉलंटरी रक्तपेढी यांचे वतीने रक्तपिशव्या संकलित करून रक्तदात्यांना प्रशस्ती पत्र वाटप करण्यात आले.गोल्डन मेमरीज ग्रुप व सोनई ग्रामपंचायत ,अशोका ज्ञानदीप ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होते.या उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा.