साईकिरण टाइम्स ब्युरो | 12 मार्च 2020
श्रीरामपूर | श्रीरामपुरातील शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी असतानादेखील आजपर्यंत पुतळा बसविण्यात आलेला नाही. शेजारील तालुक्यांमध्ये अत्यंत कमी जागेत शिवरायांचे पुतळे बसविलेले असताना श्रीरामपुरातच का बसविला जात नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. आगामी काळात शिवाजी महाराजांचा पुतळा शहरात बसवला नाही तर जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीतही पुतळा बसवण्याचा विषय महत्वाचा मुद्दा बनला होता. मागील अनेक वर्षांपासून पालिकेत ससाणे यांची सत्ता असूनही पुतळा न बसवल्यामुळे जनतेत तीव्र नाराजीही होती. त्यामुळे नूतन सत्ताधाऱ्यांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या सत्ता आल्यानंतर शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ शिवाजी पुतळा बसवण्यात येईल असे आश्वासन निवडणूक काळात दिले होते ; परंतु सत्ता येउन 2 वर्ष होऊन गेले तरी पुतळा बसवण्यासंदर्भात जलद कार्यवाही होत नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात शिवाजी चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला पाहिजे यासाठी मोठे जनआंदोलन उसळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
शिवाजी चौकात पुतळा बसवला पाहिजे या मागणीसाठी अनेक राजकीय पक्ष , संघटना यांनी आंदोलने, मोर्चे काढले निवेदने दिली परंतु आजतागायत शहरावासींचे शिवाजी चौकात पुतळा बसवण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मध्यंतरी नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांचे स्मारक बसवण्याची मागणी असलेली जागेची पाहणी कारण्यारिता आमंत्रित केले होते त्यावेळी अधिकाऱ्यांनी पुतळा बसवण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असून 2 मे 2017 च्या जीआर च्या नियमावलीनुसार पालन करावे लागणार असल्याचे सांगत शहरातून दोन राज्यमार्ग गेले असून ते दोन्ही पालिकेकडे हस्तांतरित केलेले आहेत त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी भांधकाम विभागाकडून पालिकेला सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर पुतळा बसवण्यासंदर्भात हालचाली काहीशा मंदावल्या व पुन्हा तो विषय मागे पडला.
यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुतळा बसवण्यावर अनेकवेळा चर्चा झाल्या. या विषयावर अनेकदा राजकारण पेटले आहे. नगरपालिका निवडणूक प्रचार काळात पुतळ्यचा विषय प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता. आदिक यांनी सत्ता आल्यानंतर शिवाजी चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे नागरिकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पुतळा बसवण्यासंदर्भात पालिकेकडून कार्यवाही होत नसल्यामुळे जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुतळ्याच्या प्रश्नावर केवळ राजकारण केले जात असल्याचे सर्वसामान्य नागरिक बोलू लागले आहेत. कोपरगाव, संगमनेर, नगर, राहता, राहुरी आदी तालुक्यांमध्ये अत्यंत कमी जागेतही शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे बसवलेले असताना श्रीरामपूर मधेच पुतळा का बसविला जात नाही असाही सवाल उपस्थित केला जात आहे. श्रीरामपूरची जनता पुतळा केव्हा बसविणार याची वाट पाहत असून लवकरात लवकर पुतळा बसविला नाही तर मोठे आंदोलन निर्माण होण्याची शक्यता आहे.