अहमदनगर : करोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद करावी ; ग्रामीण पञकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी

पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद करावी ; ग्रामीण पञकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर  मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी 
साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 मार्च 2020
श्रीरामपुर : जगाच्या पाठीवर कोरोना विषाणूच्या  महामारीने धुमाकूळ घातला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्यात कोरोना  संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या भल्यासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृतीसाठी आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  करणार असल्याची  माहिती  ग्रामीण  पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष  दताञय खेमनर यांनी दिली आहे.  

          महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून  याबाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे. राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला घरी राहण्याबाबत जनजागृती करत आहेत. तसेच राज्य सरकार व जनता यांच्यात दुवा म्हूणन भूमिका बजावत आहेत कोरोना हा रोग जीवघेणा आहे माहित असून देखील जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रस्त्यावर फिरून आपली भूमिका बजावत आहेत .

     केंद्र सरकार व राज्य सरकारने डॉक्टर व वैद्यकिय क्षेत्रातील तसेच जनतेसाठी वेगवेगळ्या आर्थिक तरतुदी केल्या आहेत परंतु पत्रकारांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली नाही. आज राज्यातील पत्रकारांची अवस्था अत्यंत बिकट व सुमार असून त्यात अल्प मानधनावर काम कामकारणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांची संख्या खूप मोठी आहे तरीही समाज आणि देशहितासाठी पत्रकार खूप परिश्रम घेत आहेत कुठलेही आर्थिक पाठबळ नसल्याने पत्रकारांवर उपासमारी ची वेळ आली असून वैद्यकिय उपचार करण्यासाठी देखील पैशाची अडचण आहे केंद्र सरकार व राज्य सरकार ने करोना च्या संकट समयी सर्व सामान्य जनतेला मोठया प्रमाणात आर्थिक सवलती जाहीर केल्या असून त्यात पत्रकारांचा अजिबात उल्लेख नाही. 

         मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत जातीने लक्ष घालून राज्यातील पत्रकारांसाठी कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर विशेष आर्थिक तरतूद करावी,  अशी मागणी ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  लवकरच करण्यात  येणार आहे, असे  ग्रामीण  पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष  दताञय खेमनर यांनी म्हंटले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post