साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 मार्च 2020
श्रीरामपूर : सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे संपुर्ण देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे महाराष्ट्रातील आराधी जोगती समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी आराधी जोगती समाजाला तात्काळ मदत करावी अशी, मागणी आराधी जोगती समाज महासंघाचे अध्यक्ष दिनेश गुरु कोकरे यांनी केले आहे.
आमचा हा समाज आपली कला सादर करुन, जोगवा मागून तसेच गोंधळाचे कार्यक्रम करून आपला उदर निर्वाह करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. जगभरात कोरोना संसर्गाचा फैलाव झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने या समाजावर उपास मारीची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आराधी जोगती समाजासाठी काही तरी उपाययोजना करावी आशी, मागणी आराधी जोगती समाज महासंघा कडुन होत आहे.
Tags
ताज्या घडामोडी