उक्कलगावात वारकरी संप्रदायाकडून मास्कचे वाटप
साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 मार्च 2020
श्रीरामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामूळे गावोगावी कोरोना विषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचा पुढाकाराने हभप बाबा महाराज ससाणे यांच्याकडून स्वखर्चाने मास्क तयार करून गावातच दुचाकी चालकांना व गरजुवंताना मास्कचे यांच्या वाटप करण्यात आले.
गावातच चेक नाक्यावर मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील जागृत नागरिकांनी चेक नाक्यावर प्रत्येक व्यक्तीला तोंडाला मास्क लावले पाहिजेत अशी जनजागृती करण्यात येत आहे. दुचाकीवरून येणार्या व जाणाऱ्या व्यक्तीला चारचाकी धारकांना मास्क संबधीत संदेश दिला जात आहे. यावेळी दिलीप थोरात विजय पारखे आदिनाथ जगधने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.