श्रीरामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरात किराणा दुकानासमोर वर्तुळे आखून सामान खरेदी
साईकिरण टाइम्स ब्यरो, 27 मार्च 2020
श्रीरामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीरामपूर मध्ये काही किराणा दुकानांसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळे आखण्यात आलेली आहेत. ग्राहक वर्तुळात उभे राहून स्वयंशिस्तीने सामान खरेदी करत आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवनवीन संकल्पना उदयास येत असल्यामुळे कोरोना मानवजातीला खूप काही शिकवून जात असल्याचे दिसत आहे.
![]() |
(छायाचित्र : रुपेश सिकची ) |
जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. हजारो लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने समग्र मानवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोरोनाला वैश्विक महामारी घोषित करण्यात आली आहे. यातूनच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवनवीन संकल्पनाचा उदय होत आहे.
![]() |
(छायाचित्र : रुपेश सिकची ) |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक किराणा दुकानासमोर गर्दी करू लागले. गर्दीतून कोरोनाचा फैलाव होऊ नये व खबरदारीचा उपाय म्हणून काही किराणा दुकानांसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळे आखण्यात आली आहे. नागरिक त्या वर्तुळात उभे राहून किराणा सामान खरेदी करीत आहेत.