अहमदनगर: जिल्ह्यातील डिझेल विक्रीची वेळ वाढवली ;
जिल्हा प्रशासनाकडून सुधारित आदेश जारी
साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 मार्च 2020
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पेट्रोल विक्री ही दिनांक २७ मार्च ते १४ एप्रिल, २०२० या कालावधीत पहाटे ०५ ते सकाळी ०९ वाजेपर्यंत तर डिझेल विक्री याच कालावधीत पहाटे ०५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
यापूर्वी पेट्रोल व डिझेल विक्री पहाटे ०५ ते सकाळी ०९ वाजेपर्यंतच सुरु होती. मात्र, सुधारित आदेशाद्वारे हा बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसाठी येणारी वाहने, दूध टॅंकर, शेती कामांसाठी वापरण्यात येणारी वाहने आदींसाठी सुविधा व्हावी, म्हणून ही वेळ वाढविण्यात आली आहे.