श्रीरामपूर मतदार संघात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीकडे वेधले लक्ष
साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 मार्च 2020
श्रीरामपूर |प्रवरा व गोदावरी नदीकाठच्या गावांचा निर्माण होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नदीपात्रातील के.टी वेअर बंधारे धरणाच्या पाण्यातून भरून मिळावे अशी मागणी युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरातांकडे केली आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. त्यामध्ये हाताशी आलेला गहू, आणि काढणीसाठी आलेल्या द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. याबाबतही करण ससाणे यांनी नामदार बाळासाहेब थोरातांचे लक्ष वेधले आहे, त्यावर ना.थोरात म्हणले की, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शासन माहिती घेत असून त्यासंदर्भात देखील योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले
सध्या प्रवरा व गोदावरी नद्यांच्या धरण क्षेत्रात नियोजित पिण्याचे व शेतीचे आवर्तन होऊन मुबलक पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून करण ससाणे यांनी नामदार थोरातांकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
कडक उन्हाळा सुरु झाला आहे प्रवरा व गोदावरी या दोन्ही नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या भंडारदरा आणि निळवंडे धरणातुन शेतीचे चालू असलेले आवर्तन अंतिम टप्प्यात असून हे आवर्तन संपताच लगेचच प्रवरा नदीपात्रात के.टी वेअर बंधारे भरण्यासाठी पाणी सोडल्यास पाण्याचीही बचत होईल आणि नदीकाठच्या शेतकरी व गावकऱ्यांना वेळेत पाणी मिळाल्याचे समाधान मिळेल. आणि पुढील आवर्तने सुरळीत होतील. यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील सकारत्मक असून लवकर यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरात लवकर नदीकाठच्या गावांसाठी पिण्यासाठी पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
चौकट - श्रीरामपूर मतदारसंघात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. त्यामध्ये हाताशी आलेला गहू, आणि काढणीसाठी आलेल्या द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. याबाबतही करण ससाणे यांनी नामदार बाळासाहेब थोरातांचे लक्ष वेधले आहे, त्यावर ना.थोरात म्हणले की, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शासन माहिती घेत असून त्यासंदर्भात देखील योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.