आपल्या व्यवसायाची जाहिरात असंख्य लोकांपर्यत पोहोचवा.बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :संपादक : राजेश बोरुडे, मो. 9960509441
साईकिरण टाइम्स ब्युरो | 7 मार्च 2020
श्रीरामपूर | तालुक्यातील बेलापूर येथील जनसेवा पतसंस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही बेलापूर बसस्थानकाजवळ पाणपोईची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नुतन पाणपोईचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.7) रोजी निवृत्त शिक्षक लक्ष्मणराव डोखे यांच्या हस्ते पार पडला.
बसस्थानक परिसरात पंचक्रोशीतील प्रवासी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांची पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्ष्यात घेऊन जनसेवा पतसंस्थेनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. पतसंस्थेच्या याठिकाणी जार व्दारे थंड पाणी पुरविले जाणार असून त्यासाठी स्वच्छतेची काळजी घेतली जाणार आहे. या लोकार्पण सोहळयासाठी प्रवासी संघटनेचे रणाजित श्रीगोड, हिंद सेवा मंडळाचे संजयचंद्र जोशी, चेअरमन सुवालाल लुकंड, व्हा.चेअरमन सुभाष चंद्र राठी, संचालक प्रकाश चंद्र कोठारी, प्रविण लुक्कड , अमित लुक्कड, योगेश कोठारी, दिपक वैष्णव, सचिन कोठारी, बन्सीकाका तागड, विजय कटारिया, बेलापूर बसस्थानकचे व्यवस्थापक बागुल कचरु वाबळे आदी सह संस्थेचे सेवक वर्ग उपस्थित होते.