साईकिरण टाइम्स ब्युरो | 3 मार्च 2020
श्रीरामपुर|राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा नदीपाञातुन वाळुतस्करी होत होती. राहुरीचे तहसिलदार शेख यांच्या आदेशा वरुन चिंचोली येथे महसुल खात्याने प्रवरा नदी पात्रातील रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदले होते ;वाळुतस्करांनी खड्डे बुजवुन राञीच्या वेळी चोरटी वाळु वाहतुक सुरु केली आहे.
वाळूतस्कर खड्डे बुजवून वाळू तस्करी करणार हे निश्चित होते. राहुरी पोलिस व महसुल खात्याने या वाळु तस्कराला पाठीशी न घालता या ठिकाणी कारवाई करावी ; अन्यथा भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस दताञय खेमनर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.