शिक्षणाबरोबरच संस्काराचे बीज प्रत्येकाने लावावे ;बाळासाहेब सोनवणे


छायाचित्र : राहुल राजळे 

साईकिरण टाइम्स ब्युरो|दि. 2 मार्च 2020
नेवासा |दादा दरंदले|शिक्षणाबरोबरच श्रमाची कास प्रत्येकाने धरली पाहिजे कारण माणूस हा अनुभवातून शिकत असतो. शालेय शिक्षणाबरोबरच संस्काराचे बीज हे राष्ट्रीय सेवा योजना सारख्या शिबिरामधून विद्यार्थ्यांना मिळत असते आणि हा अनुभव कृषी महाविद्यालय सोनई च्या विद्यार्थ्यांनी खरोखरच सत्यात उतरवला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी मोरया चिंचोरे येथे लावलेल्या 5000 झाडांपैकी 3000 झाडांना कृषी च्या विद्यार्थ्यांनी जे मल्चिंग केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे.अशी प्रतिक्रिया नेवासा पंचायत समिती  सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी व्यक्‍त केली. 


               कृषि महाविद्यालय सोनई, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून मोरया चिंचोरे याठिकाणी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे होते ते म्हणाले श्रमप्रतिष्ठा बरोबरच स्त्रियांचा आदर करायला शिकले पाहिजे . पुस्तकाच्या पलिकडचे जग आपापल्या कामातून दिसले पाहीजे. साधी राहणी आणि उच्च विचार असलेली माणसे नेहमीच जिवनात मोठे होत असतात. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा. संदीप तांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात गेली सात दिवस विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. दररोज दुपारी प्रबोधनपर व्याख्यानमालेत राष्ट्रीय सेवा योजना ध्येय व उद्दिष्टे-प्रा.संदीप तांबे, परस बागेचे नियोजन-प्रा.योगेश जाधव,जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज-शिवाजीराव वाघ ,जवखेड,ताण तणाव व्यवस्थापन-प्रा.सुहास माने, कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील उपयोग-प्रा.सोमनाथ दरंदले,व्यसनमुक्ती -प्रा.राजेंद्र लीपने व महिला सक्षमीकरण- प्रा. प्रियदर्शनी जाधव यांचे नियमित व्याख्यान झाले. याप्रसंगी झापवाडीचे सरपंच शशीकांत वाघ,भगवानराव गांडूळे ,भरत गर्जे,प्रा. बाबासाहेब दराडे, साहेबराव ईलग,कारभारी मोरे,प्रा.सुहास माने आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. बाबासाहेब दराडे, स्वयंसेवक सोनाली घोगरे, आकाश फुंदे ,प्रीती शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून वरुन तुवर व चव्हाण श्वेता यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरुण तुवर व कोमल वेठेकर यांनी केले तर सोनल शिंदे हिने आभार मानले.

Rajesh Borude

Previous Post Next Post