साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मार्च 2020
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर घेऊन शहरात किंवा रस्त्यावर येऊ नये. याची अंमलबजावणी केली नाही पोलीस कारवाईस सामोरे जावे लागेल तसेच प्रशासन दंडात्मक कारवाई करेल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
या संचारबंदीचा उद्देश नागरिकांनी समजून घ्यावा. आपणास घरी तसेच घराबाहेर एकमेकांपासून अंतर ठेवून राहायचे आहे. जेणेकरुन आपल्याला लागण होणार नाही हे सर्व आपल्या हितासाठी करीत आहोत हे लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.
उद्यापासून भाजी विक्रेते कुठेही रस्त्यावर बसणार नाही त्यांना लोटगाडी किंवा डोक्यावर घेऊन शहरात कॉलनी परिसरात फिरता येईल. तसेच किराणा/ औषधी घेण्यासाठी सुध्दा पायीच यावे लागेल ; त्यामुळे आपण आपल्या घराशेजारील दुकानातच जावे, असे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी स्पष्ट केले आहे.