घोडेगावात मांगिरबाबा यात्रौउत्सवाची जय्यत तयारी सोमवार पासून यात्रौत्सवास प्रारंभ



साईकिरण टाइम्स ब्युरो | 5 मार्च 2020
नेवासा |दादा दरंदले | तालुक्यातील घोडेगाव येथे सालाबादप्रमाणे या वर्षी ही मोठ्या उत्साहात देव मांगिरबाबा यात्रा उत्सव दि ९ ते ११ मार्च या काळात साजरा होत आहे.

              सोमवार दि.९ मार्च रोजी रात्री ९ -११ या वेळेत रामायणाचार्य ह.भ.प.राजेंद्र महाराज गोंदिकर(जालना)यांचे मारुती मंदिर परिसरात हरीकीर्तन होईल मंगळवार दि.१० मार्च   रोजी पहाटे ५-०० वा.कावडी मिरवणूक गंगास्नान होईल.व त्यानंतर मांगिरबाबा देवास नैवेद्य अभिषेक व घोडेश्वरी मातेस चोळी पातळाचा कार्यक्रम होईल. व रात्री छबिना पालखी मिरवणूक निघेल हारूणभाई शेख वांबोरीवाले,व अन्सारभाई मिरीवाले यांच्या शोभेच्या दारूचा कार्यक्रम होईल.  

            या वर्षी ही महाराष्ट्रातील नामांकित अमर ब्रास बँण्ड बारामती,चाऊस ब्रास बँण्ड वैजापूर,सरस्वती ब्रास बँण्ड अंबड,श्री कृष्ण ब्रास बँण्ड हडपसर,पुणे यांचा जुगलबंदी सामना होईल.
    
         बुधवार दि.११ मार्च रोजी महाराष्ट्रातील अग्रेसर आनंद लोकनाट्य तमाशा (जळगांव) श्री मांगिरबाबा यात्रा कमिटी यांच्या वतीने मोफत दाखवण्यात येईल.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post