साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 मार्च 2020:
श्रीरामपूर : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला उक्कलगावसह,बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द,नरसाळी, आदीसह प्रवरा एकलहरे, जवाहरवाडी,आठवाडी, लजपतराय वाडी,उक्कलगाव मधील पटेलवाडी,खंडाळा रोड परिसर, कोल्हार रोड,परिसर गळनिंब,कुरणपूर, फत्याबाद, मांडवे, कडीत बुद्रुक कडीत खुर्द, चांडेवाडी तांबेवाडी,आदींसह श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा परिसरातील गावांमध्ये जनता कर्फ्यूला सर्वच दुकाने बंद ठेवुन चांगला प्रतिसाद दिला आहे.
सकाळपासून सर्वच रस्त्यावर शुकशुकाट आहे. गावातील बसस्थानक जवळ शुकशुकाट वातावरण पहावयास मिळत आहे. उक्कलगावकरांनी जनता कर्फ्यू ला 100 टक्के प्रतिसाद दिला असून गाव कडकडीत बंद पाळून शासनाच्या आदेशानुसार पालन करत गो कोरोना गो. असे म्हणत शासन दरबारी आदेश पालन केले.
बेलापूरसह बनात, नरसाळी,कोरोना विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी तसेच विशेष खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार बेलापूरातील गावातील अत्यावश्यकच सेवा सह इतर दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे एरवी नेहमीच झेंडा चौकापासूनच्या असलेल्या बाजारपेठेमधील रस्त्यावर शुकशुकाट वातावरण होते. सर्वच रस्ते निर्मनुष्य उघडे दिसत होते. गावातच कुठेही नागरिकांची रेलचेल नव्हती सगळीकडेच शांतता पसरली होती अश्याप्रकारे कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.