उक्कलगाव विद्यालयात 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ



साईकिरण टाइम्स ब्युरो 
उक्कलगाव |प्रतिनिधी | दि. 1 मार्च 2020| एस एस सी परिक्षा मार्च २०२० ला प्रविष्ठा होणार्‍या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच न्यु इंग्लिश स्कूल उक्कलगाव विद्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य बबनराव तागड हे होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक सहकारी बॅकचे अहमदनगर शाखेचे जनरल मॅनेजर प्रदिप नामदेव थोरात हे उपस्थित होते.   

            माजी प्राचार्य बबनराव तागड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन परिक्षेत प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 हजार 20  रुपयांची ठेव, निधी स्वरुपात विद्यालयास सुर्पुर्त केला.  प्रदिप थोरात यांनी स्वतःचे शिक्षण व जीवन प्रवास अतिशय मार्मिकपणे विद्यार्थ्यांसमोर ठेवत आजच्या स्पर्धेच्या युगाचे महत्व विशाद केले. त्यानिमित्ताने विद्यालयास बांधकामासाठी २१ हजार रुपयाची देणगी दिली. या कार्यक्रमाप्रंसगी खा. गोविंदराव आदिक ग्रामिण शिक्षण संस्थेचे सदस्य हंसराज आदिक,  भाऊसाहेब वाघ, अॅड जंयतराव चौधरी तसेच सूनिल बन्सी थोरात, शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे भाऊसाहेब कर्डीले, शिक्षण पालक संघाचे नंदकुमार थोरात, उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन अॅड पुरुषोत्तम थोरात, व्हा.  चेअरमन शिवाजी थोरात,  पालक कचरु पारखे आदी सह उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरकर सर यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ औताडे, वर्गशिक्षक गोरे सर, अॅड चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक बंगाळ सर,  वाकचौरे सर, उंडे सर, गाडेकर सर,  कोळगे सर पारखे सर,  बोरुडे सर, रोकडे सर, मोरे सर, शिक्षिका गिरमे मॅडम,  श्रीमती लांडे मॅडम,  थोरात मॅडम यांनी  विशेष प्रयत्न केले तर रविद्र थोरात, गुलाब गाडेकर, साहेबराव गाडेकर शिरसाठ मामा,  साळवे मामा यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन वाघमोडे सर व श्रीमती बनकर मॅडम यांनी केले आणि कु रुपटक्के मॅडम यांनी आभार मानले.

Rajesh Borude

Previous Post Next Post