साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 17 मार्च 2020
श्रीरामपूर|श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद महाराजांची गुढीपाडव्याच्या दिवशी शुभमुहूर्तावर होणारी यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व श्रीरामपूर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रा रद्द करण्यात आली आहे.
सालाबादाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुडीपाडवा या दिवशी यात्रेस प्रारंभ होत असतो तीन दिवस होत असलेल्या यात्रेस पंचक्रोशीतील भाविक भक्त हरिहर केशव गोविंद महाराजांचे दर्शनासाठी येत असतात. कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पीआय श्रीहरि बहिरट यांनी या आशयाचे पत्र ग्रामविकास अधिकारी, संरपच यांच्या सह उपसंरपच यांच्या नावाने दिले आहेत.
उद्याचा बुधवारचा आठवडे बाजार बंद...
कोरोना विषाणूंचा रोगाने थैमान घातले असतानाच प्रशासनाने सगळीकडे खबरदारी घेतली असून,श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव मधील उद्याचा बुधवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. पुढील बुधवारचा आठवडे ३१ मार्च पर्यंत बंद राहील.यात्रा कमिटी व संरपच व उपसंरपच यांच्या कडुन आवाहनही करण्यात येत आहे की, व्यापारी वर्गानी, भाजीपाला विकेत्यांनी, दूकानदारांनी,व भेळवाल्यांनी आपले दुकाने बाजारात थाटली जावू नयेत. असे ग्रामपंचायत प्रशासनाकडुन सांगण्यात आले.
प्रशासनाच्या परिपत्रकाची दखल घेत श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या मदिरांत यात्रा कमिटी व ग्रामस्थांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या निर्णयावरून कोणत्याही प्रकारचे खेळणी, मिठाईवाले, कटलरी दुकाने पाण फुल आदी सह दुकाने थाटली जाणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारेचे मिरवणूक, संगीतमय कार्यक्रम, किर्तन प्रवचन नमाज सांस्कृतिक कार्यक्रम मेळावे चर्चासत्र शिबिरे हंगामा कुस्तया यात्रे निमित्ताने होणार नाहीत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या आणलेल्या पाण्याची मिरवणूकीही रद्द करण्यात आली आहे. यात्रा उत्सवनिमित्त होत असलेल्या गुडी पाहणे, पेढे वाटणे,धार्मिक विधी कार्यक्रम केले जातील विशेष करुन भाविकांनी सुमहाने दर्शनासाठी येणे टाळावे असे प्रशासनाकडुन सांगण्यात आले. मंगळवारी झालेल्या श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या मदिरांत यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी महत्वपूर्ण निर्णयाखातर देवस्थानाच्या मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. झालेल्या यात्रा कमिटीच्या बैठकीत आबासाहेब थोरात, संरपच नितीन थोरात, उपसंरपच रवींद्र थोरात, हभप रविद्र मुठे, रविद्र जगधने, अनिल थोरात, दिलीप थोरात, लक्ष्मण थोरात जालिदर थोरात, विकास थोरात, केशव तावरे, आदीनाथ जगधने, बाबासाहेब मोरे, शरद थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.