शनिशिंगणापूर | शिर्डी | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून श्री शनैश्वर दर्शन बंद ; शिर्डीतील साईमंदिर प्रवेशही दुपारी 3 वाजल्यापासून बंद



साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 17 मार्च 2020
अहमदनगर |जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अहमदनगर जिल्ह्यातल्या  नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान येथे आज मंगळवारी सायंकाळी ( दि. 17) साडेसहाच्या  आरतीपासून, भक्तनिवास, प्रसादालय व शनिदेवाचे दर्शन पुढील प्रशासकीय आदेश येऊ पर्यन्त अनिश्चित काळापर्यन्त बंद ठेवण्यात येणार आहे, असे शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाच्या  वतीने सांगण्यात आले आहे. तसेच जगभरातील  करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रवेशही आज (दि. 17) दुपारी  दुपारी 3 वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. 



          दि. 20 मार्च रोजी मासिक वैद्य एकादशीनिमित्त होणारी किर्तनसेवा व 25 मार्च रोजी होणारी  गुडीपाडवा यात्रा तसेच उदासी महाराज सप्ताह रद्द करण्यात आला असल्याचे शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

           जगभरामध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण तसेच महाराष्ट्रतील विषाणूबाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रित करण्याचा निर्णय घेऊन  सर्व प्रकारच्या  धार्मिक स्थळांना दर्शन बंद करण्याचा तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद  व  सामाजिक जबाबदारी  म्हणून श्री शनैश्वर देवस्थान प्रशासनाने नियोजित कार्यक्रम पूर्णतः बंद केलेले असल्याचे सांगण्यात आले. 
            


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post