साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 16 मार्च 2020
येवला|नाशिक औरंगाबाद महामार्गावरील चांदोरे शिवारातील खरात पेट्रोल पंपाजवळ रविवारी ( दि. 15 ) रात्री 10 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचे 6 महिन्याचे नर जातीचे बछडे मृत्यू पावले.
![]() |
चांदोरे | रविवारी रात्री नाशिक औरंगाबाद महामार्गावर चांदोरे शिवारात वाहनाच्या धडकेने बिबट्याचे बछडे मृत्यू पावले. |
बिबट्याच्या तोंडाला व मानेला मार लागलेला होता. त्याला निफाड येथील रोपवाटिकेत ठेवले होते. सोमवारी ( दि.16) रोजी सदर बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकार डॉ. रवींद्र चांदोरे यांनी शवविच्छेदन केले. सदर बिबट्याच्या तोंडाला व मानेला जबर मार लागल्याने लागल्यामुळे मृत झाल्याचे डॉ. चांदोरे यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे, वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक व्ही. आर. टेकनर आदी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.