नेवासा | दादा दरंदले |संपूर्ण देशावर नव्हे तर विश्वावर कोरोना या रोगाचे फार मोठे संकट उभे आहे.विश्वात राहणाऱ्या सर्व मानवजातीवर अतिशय दुर्धर अशा प्रकारचे संकट ओढवलेल असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहा काळजी घ्या.देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री इतर सर्वच मंत्री महोदय अधिकारी वैज्ञानिक डॉक्टर कर्मचारी शासकीय कर्मचारी सर्व या कोरोना रोगाचा प्रभाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे तरी सर्व व नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करा व सहकार्य करा तसेच उद्या रविवार दि २२ मार्च रोजी होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत सहभागी व्हा.असे आवाहन देवगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
Tags
ताज्या घडामोडी