आज गुगल सर्च इंजिन वर कोणाची प्रतिमा आहे जाणून घ्या
गुगल वर आज कोणाचे आहे डुडल???
छायाचित्र स्रोत : गुगल / Photo Source : Google
श्रीरामपूर | साईकिरण टाइम्स ब्युरो | 28 फेब्रुवारी 2020|आज जगातील असंख्य लोकांनी गुगल सर्च इंजिन चालू केल्यानंतर त्यावर एक नवीनच प्रतिमा दिसली. जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगल ( Google ) ने आज दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी महान चित्रकार, राजकीय व्यंगचित्रकार, व्यंग कलाकार सर जॉन टेनील (sir John Tenniel) यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त गुगल डुडल तयार करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
लंडन मध्ये 28 फेब्रुवारी 1820 ला त्यांचा जन्म झाला होता. सण 1893 मध्ये कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना नाइट पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. 20 व्या वर्षी सर जॉन टेनील यांच्या जीवनात एक दुर्घटना घडली. त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. त्यांनी रॉयल अकादमी या शाळेत त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी 1836 मध्ये त्यांचे पहिले चित्र सोसाइटी ऑफ ब्रिटिश आर्टिस्ट्स येथील प्रदर्शनात पाठविले. त्यानंतर वेस्टमिंस्टर पॅलेसमधील स्पर्धेत त्यांनी 16 फूट उंचीचे कार्टून तयार केले त्यासाठी त्यांना 100 युरो रक्कम मिळाली होती. टेनील यांचा पंच मॅगझीन साठी प्रमुख राजकीय कार्टूनिस्ट म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. सर जॉन टेनील यांचे कार्टून लोकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचे कार्टून जगामध्ये लोकप्रिय झाले. टेनील यांच्या जयंतीनिमित्त आज गुगलने गुगल डुडल तयार करून आठवणींना उजाळा दिला.
Tags
जनरल नॉलेज