साईकिरण टाइम्स ब्युरो
श्रीरामपूर|दि.27|जागतीक संविधान व संसदीय संघ अर्थात वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन व पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) च्या वतीने गुरुवार दिनांक १९ मार्च २०२० रोजी स्व. सिंधुताई विघावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय काव्यसमेलन आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेचा आदर, पृथ्वी संविधान, विश्वशांती, लोक तांत्रीक बाबींचे मूल्य व सामाजिक एकोपा या गोष्टींना प्राधान्यक्रम देऊन संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींनी आपल्या कोणत्याही विषयावरील दोन स्वरचित रचना, आपला फोटो, व्यक्तीगत परिचय, dattavighave@gmail.com या मेल आयडीवर पाठवाव्यात. विद्रोही कविता स्विकारल्या जाणार नाहीत.
आपल्या या कवितांचा एक सामुहीक काव्य संग्रह बनविण्यात येणार असून संबंधीत काव्यसंग्रहाचे एक डिजीटल पुस्तक बनवून डब्ल्यूसीपीएच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करून सर्व कवींना एक जागतिक व्यासपिठही मिळवून देण्यात येणार आहे.
सदर काव्य संमेलनात सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून काव्यसंग्रहात सहभागी होणाऱ्या कवींना छपाई खर्चासाठी रुपये पाचशे शुल्क घेण्यात येणार आहे. तरी पाच मार्च २०२० पर्यंत
दत्ता विघावे, अध्यक्ष -डब्ल्यूसीपीए
श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टर, मु.पो. खंडाळा, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर. मोबाईल -९०९६३७२०८२. या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन दत्ता विघावे यांनी केले आहे. सामुहिक काव्यसंग्रहात सहभागी होण्याचे कोणावरही बंधन नाही. काव्य संमेलनात सहभाग घेणाऱ्या कवींना स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
Tags
प्रादेशिक