श्रीरामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत DIRTY PICTURE




श्रीरामपूर  येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत  DIRTY PICTURE 




साईकिरण टाइम्स ब्युरो | 27 फेब्रुवारी 2020

श्रीरामपूर | नियोजित जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या श्रीरामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या  अनास्थेमुळे डर्टी पिक्चर पहायला मिळत आहे. जेथे 'थुंकू नका', '500 रुपये दंड' असे  लिहिले आहे तेथेच गुटखा व तंबाखू खाल्ल्यानंतर  पिचकाऱ्या मारून  भिंती रंगल्या जात आहेत. इमारतीत सिसिटीव्ही कॅमेरे बसवलेले दिसत असताना तंबाखू, गुटखे व तत्सम पदार्थ खाऊन इमारतीत कर्मचारी अधिकारी पिचकाऱ्या मारतात का??? का इतर कोण??  याचा  सिसिटीव्ही फुटेज मध्ये शोध घेऊन दोषींवर प्रशासन काय कारवाई करणार??? असा, सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे. 

श्रीरामपूर |येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील पुरवठा कक्षाच्या प्रवेशद्वारालगत 'थुंकू नये ', 500 'रुपये दंड' असे जीथे लिहले आहे तिथेच धूम्रपान करून  थुंकण्यात आले आहे. 



                श्रीरामपूर येथील  मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे  30 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. तदनंतर 23 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब  थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते सदर इमारतीचा उद्धाटन झाले. 



श्रीरामपूर |उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या वॉटर कुलरची दुर्दशा झाली आहे. वॉटर कुलर गंजले, सडले आहे. वॉटर कुलरचे कॉक तुटले असून त्यामध्ये पाणी नसते. वॉटरकुलरच्या शेजारी  घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले वॉटर कुलर प्रशासनाच्या अनास्थेमुळे गंजले सडले आहेत. वॉटर कुलर शेजारीच स्वच्छतागृह व शौचालय  असून तेथेही अस्वच्छता आहे.  जिन्याखाली ठिकठिकाणी थुंकले आहे. 


              मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसील कार्यालय, पुरवठा कक्ष, निवडणूक कार्यालय,  उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, नागरी सुविधा केंद्र यासारखी शासकीय कार्यालये असल्याने रोज शेकडो लोक कामानिमित्त या कार्यालयात येत असतात. 
कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना पाणी  पिण्यासाठी असणाऱ्या वॉटर कुलरची अत्यंत दुर्दशा झाली आहे. वॉटर कुलरचे कॉक तुटले असून त्यामध्ये पाणी नसते. वॉटरकुलरच्या शेजारी  घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले वॉटर कुलर प्रशासनाच्या अनास्थेमुळे गंजले सडले आहेत. वॉटर कुलर शेजारीच स्वच्छतागृह व शौचालय  असून तेथेही अस्वच्छता आहे.  जिन्याखाली ठिकठिकाणी थुंकले आहे. इमारतीत  ठिकठिकाणी गुटखा व तंबाखू खाऊन भिंती रंगवलेल्या आहेत. जिथे थुंकू नका लिहिले आहे व  थुंकल्यास 500 रुपये दंड होईल असे असताना तिथेच थुंकून भिंती अस्वच्छ, विद्रुप केल्या आहेत.  कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.  इमारतीत ठेवलेले बाकडे तुटले आहेत. ठिकठिकाणी अस्वछता आहे.  इमारतीत अनेक जाळ्या लागल्या आहेत. इमारतीलगतच्या  परिसरातही ठिकठिकाणी गवत वाढलेले आहे. भंगार वाहने अस्तव्यस्त पडलेली आहेत.  प्रशासनाच्या अनास्थेमुळे इमारत इमारत भकास झाली आहे. 




                पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान चालू केलेले असताना शासकीय कार्यालयेच स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातीवर  शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे स्वच्छता अभियानाला हरताळ फासला जात आहे.


Rajesh Borude

Previous Post Next Post