साईकिरण टाइम्स ब्युरो |24 फेब्रुवारी 2020
श्रीरामपूर |पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोर अनेक भागांमध्ये राहत आहेत त्यांचा पोलीस यंत्रणेने शोध घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना आपल्या देशातुन हाकलून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सोमवारी (दि.24) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना देण्यात आले .
यावेळी मनसेचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपजिल्हा अध्यक्ष संजय नवथर, शहराध्यक्ष निलेश सोनवणे , सुभाष सोनवणे , नंदू गंगावणे , सुरेश जगताप , अतुल तरडे , राजू वायकर , करण कापसे , ज्ञानेश्वर काळे , संतोष गुंजाळ , नवनाथ बोरुडे, गणेश लोखंडे, प्रवीण पवार, लक्ष्मण गायकवाड, बलराम जंगम, विकास शिंदे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, बांगलादेशी व पाकिस्थानी घुसखोरांना आपल्या देशातून हाकलून द्यावे यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी मोर्चा काढला होता. त्यांनतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सोबत घेऊन मुंबई, पुणे, नाशिक येथे पाकिस्थानी बांगलादेशी घुसखोर धरून दिले. हे घुसखोर श्रीरामपूर परिसरात देखील असण्याची शक्यता आहे. हे घुसखोर एजंटांना पैसे देऊन खोटे कागदपत्रे तयार करतात. रेशनकार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड अशी खोटे कागदपत्रे तयार केलेली आहेत. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अधिकाऱ्यामार्फत बनवलेल्या रेशनकार्डची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. आपल्या देशात जे बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले होतात त्यांना हेच घुसखोर मदत करतात. पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोर देशाला घातक ठरत असल्याने लवकरात लवकर श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags
ताज्या घडामोडी