सा.बा. च्या आशीर्वादाने कोल्हार - बेळपिंपळ्गाव रस्त्याचे केबल खोदाई कामामुळे मोठे नुकसान ; जि. प.सदस्य शरद नवलेंचे सा.बा समोर उपोषण ...


सा.बा. च्या आशीर्वादाने कोल्हार - बेळपिंपळ्गाव रस्त्याचे केबल खोदाई कामामुळे मोठे नुकसान ; जि. प.सदस्य शरद नवलेंचे सा.बा समोर  उपोषण ... 



साईकिरण टाइम्स ब्युरो |27 फेब्रुवारी 2020
अहमदनगर | सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत कोल्हार ते बेळपिंपळ्गाव रस्त्याच्या साईडपट्टीत खाजगी केबल कंपनीने केबल टाकून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आशीर्वादाने रस्त्याचे मोठे नुकसान केले असून, याबाबत तक्रारी करूनही दखल न घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर येथील उपअभियंता व शाखा अभियंता यांना निलंबित करून खाजगी कंपनीवर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी ( दि. 27)  सर्ववाजनिक बांधकाम विभाग अहमदनगर  येथे जिल्हा परिषद  सदस्य  शरद नवले,  उपसभापती बाळासाहेब तोरणे आदींनी उपोषण सुरु केले आहे. 

              

            कोल्हार ते बेलपिंपळगांव रस्ता प्रजिमा २१ खाजगी कंपनीने केबलसाठी केलेल्या नुसकानी संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम विभागकार्यालय अहमदनगर कार्यालयासमोर  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु आहे.  या खाजगी कंपनीने केबल टाकण्याचे काम बेकायदेशिर सुरु केलेले असुन, सदर काम करताना मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांचे कडिल,पञ क्र  का४,/ सां बा प्रा / ई ओ एफ सी / अहमदनगर / प्रजिमा २१/ ६६४९/ २०१९ दिनांक ३/ १२/ २०१९.मधिल कोणत्याही अटि व शर्तीचेचे पालन केलेले नाही.  त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रस्ताचे कडेची झाडे बेकायदेशीर तोडलेली आहेत नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्य मागापासुन १५ मिटर आत कोणतेही काम करता येत नाही.  खोदाई करण्याच्या कामास सुरूवात करण्यापुर्वी कामाच्या  ठिकाणा पासुन दोन्ही दिशेला १०० मिटर अंतरावर सावधानतेचा    इशारा देणारे  फलक,  रिफलेक्टर स्टीफचा वापर करुन लावणे आवश्यक आहे. तसेच राञीचे काम सुरु असताना किंवा अपुर्ण राहिल्यास माहितीगार तंञज्ञानासह राञभर तेवत राहणारा लाल प्रकाश झोताचा दिवा लावण्याची वा तस्सम व्यवस्था खाजगी कंपनीने करणे हा नियम आहे; पंरतु या खाजगी कंपनीने कोणत्याही प्रकारचे नियम पाळलेले नाही  यासंदर्भात जि.प. सदस्य शरद नवले यांनी  वेळोवेळी  अधिक्षक अभियंता सां. बा. अहमदनगर  कार्यकारी अभियंता संगमनेर, उपअभियंता श्रीरामपूर  यांचेकडे वेळोवेळी लेखी पञ व्यवहार करुन तसेचे दुरध्वनी संपर्क साधुन चुकिच्या  पध्दतीने काम सुरु असल्याचे फोटो पुरावे संबंधित आधिकाराचे व्हाँटसँपला पाठवुन बेकायदेशीर काम सुरु असल्याचे निदर्शनास आणुन दिले आहे. या कामी चौकशी करण्याची विनंती केलेली आहे ; पंरतु याकडे या सर्वानी दुर्लक्ष करुन संबंधित काम करणाऱ्या या एजन्सीला पाठीशी घातले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  या कामाची व नुकसानीची चौकशी करण्याचे आदेश आपले स्तरावरुन संबंधित आधिकारांना द्यावेत व या कामामध्ये दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकऱ्यांना  निलबिंत करण्यात यासाठी  उपोषण सुरु आहे.  जि.प सदस्य  शरद नवले, उपासभापती बाळासाहेब तोरणे, पंचायत समिती सदस्य  कल्याणी कानडे, वैशाली मोरे, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष  दताञय खेमनर,  पढेगांवचे  सरपंच प्रशांत लिप्टे, लाडगांवचे सरपंच सिंकदर शेख,  मालुजा सोयासटी चेअरमन संपत गायकवाड,  पढेगांव सोसायटी चेअरमन यशवंत बनकर,  भेर्डापुरचे  मालुजा सरपंच निवृती बडाख,  व्हाईस चेअरमन विठ्ठल बनकर,  योगेश काळे, उपसरपंच विजय काळे कान्हेगांवचे गिताराम खरात, आर पी आयचे  आरविद साळवी,  भगवान मोरे,  बबन गायकवाड, श्रीराम मोरे, अजित शेख, जाकीर शेख सुलेमान भाई शेख नामदेव मेहञे  गणेश भाकरे, दताजी नागवडे भालेराव सर शकिल भाई, रामदास कांदळकर,  दताञय हाळनोर,  भैया शेख, जालिंदर रोडे, संतोष बोरुडे,  बापु हिवरकर,आपा  लिप्टे, सुभाष अमोलिक संतोष अमोलिक  सतिष भाऊ कानडे  आदी यावेळी  उपस्थित होते.

Rajesh Borude

Previous Post Next Post