चांडेवाडीत मादी बिबट्या बछड्याच्या शोधात आली अन अलगद पिंजऱ्यात अडकली......
शनिवारी रात्री मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली
साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 23 फेब्रुवारी 2020
श्रीरामपूर |श्रीरामपूर तालुक्यातील चांडेवाडी येथे वनविभागाने एका शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या पिंजर्यात शनिवारी रात्री (दि. 22) 9 वाजेच्या दरम्यान एक मादी बिबटया पिंजर्यात अलगद अडकली. शनिवारी सकाळी ऊसतोडणी चालू असताना ऊसतोडणी कामगारांना बिबट्याचे बछडे आढळून आले होते. वनविभागाने ते बछडे पिंजऱ्यात ठेवले. दरम्यान त्याच बछड्याच्या शोधात मादी बिबट्या रात्री आली आणी पिंजऱ्यात अडकली.
पिंजर्यात भक्ष ठेवलेले असताना बिबट्या त्याकडे फिरकालाही नाही. दरम्यान मादी बिबट्या बछड्याच्या शोधात तेथे अली अन तेथे लावलेल्या पिंजर्यात अलगद अडकली. बिबटयाच्या दहशतीमुळे गळनिंब सह प्रवरा परिसरात घबराट पसरली असल्याने दिवसांपासून लहान मुलांवर माणसांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबटे वनविभागाच्या पिंजर्यात अडकत नव्हते. वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. गळनिब परिसरातील ज्ञानेश्वरी मारकड या तीन वर्षीच्या मुलीवर नरभक्षक बिबटयाच्या हल्ल्यात ती मृत पावली होती. उक्कलगाव गळनिंब, कुरणपूर, फत्याबाद, मांडवे, एकलहरे, ममदापुर, कडीत बु, कडीत खुर्द या प्रवरा नदीपात्राशेजारील गावातच बिबटयाचा वावर आहे. पंचक्रोशीतील नागरिक बिबट्याच्या दहशतीने भयभीत झालेले आहेत. चांडेवाडीत याठिकाणी ड्रोन कॅमेरा लावण्यात आला होता. कॅमेरे असताना बिबटयाचा शोध घेतला जात होता त्यांचा काहीच उपयोग होऊ शकत नव्हता शनिवारी (दि. 22)रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान चांडेवाडीत गाडेकर यांच्या उसाच्या शेतात ऊसतोडणी कामगारांना बिबटयाचे बछडे आढळून आले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्याने बछडे ताब्यात घेत पिंजर्यात ठेवण्यात आले होते. त्याच बछड्याच्या शोधातच असलेली मादी बिबट्या अलगद पिंजर्यात अडकली होती तातडीने वनविभागाचे अधिकार्यांनी चांडेवाडीत म्हसे वस्तीवर जात मादी बिबटया बछडे ताब्यात घेतले होते वनविभागाचे नगरचे उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, नगर वनविभागाचे रमेश देवखिळे, आदेशानुसार कोपरगावचे वनक्षेत्रपाल संतोष जाधव, वन अधिकारी गाढे, दक्षताचे पथकाचे विकास पवार, नेवासेचे वनपाल, राहुरीचे वनपाल घटनास्थळी दाखल होऊन मादी बिबटया व बछडे ताब्यात घेतले. बिबटया पिंजर्यात अडल्याची माहिती कळताच चांडेवाडीतील नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाला मदत करण्यासाठी चांडेवाडीतील नागरिकांनी मदत केली होती. तेथील शेतातच नवीन पिंजरा लावण्यात आल्याने भक्षही होते बछड्याच्या शोधातच मादी बिबट्या अलगद पिंजर्यात अडकली होती. खाकटयाचा मोठा आवाज आल्याने म्हसे हे शेतात गेले असता त्यांना मादी बिबट्या अडकलेली दिसली. वन अधिकाऱ्यांनी लावलेल्या ड्रोन कॅमेरातही वन अधिकाऱ्यांना दिसले होते. उक्कलगाव सह परिसरात बारा पिंजरे लावण्यात आले. परिसरातील चांडेवाडीत येथे मादी बिबट्या जेरबंद करण्यात आली त्या बिबटयाला राहुरीत नर्सरीत नेण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुण, पुढील सुचना आल्यांंनतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर उद्यानात किंवा कोतुळ येथील उद्यानात नेण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags
ताज्या घडामोडी