साईकिरण टाइम्स ब्युरो | अहमदनगर दि.7
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये इयत्ता 1 ली प्रवेशासाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2020 पर्यत ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अनूसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 1 ली प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनूसूचित जमातीचा असावा, त्याचे वय 5 वर्षे 8 महिने पूर्ण असावे. पालकांचे उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अंगणवाडी/ग्रामसेवकांचा जन्माचा दाखला, पालक दारिद्रय रेशाखालील असल्यास ग्रामसेवकांचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्पोटित, निराधार असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला व विद्यार्थ्यांचे आधार कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट साईजचे दोन फोटोची आवश्यकता आहे.
वरील कागदपत्रांची पुर्तता करुन अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर ता. अकोले जि.अहमदनगर येथे 28 फेब्रुवारी 2020 पर्यत सादर करावेत. या प्रवेशासाठीचे राजूर कार्यालयामध्ये अर्ज विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण आर के साबळे (मो. 9021384047) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Tags
शैक्षणिक