चांडेवाडीनंतर उक्कलगावात अखेर दुसरी बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली... ; श्रीरामपूर तालुक्यातील घटना





साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 24 फेब्रुवारी 2020
श्रीरामपूर|तालुक्यातील उक्कलगाव येथील धनवाट परिसरातील जगधने यांच्या उसाच्या शेतात रविवारी ( दि. 23) रात्री 9 वाजेच्या दरम्यान बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच बिबट्याला ताब्यात घेतले. शनिवारी (दि.22) रात्री चांडेवाडी येथेही  बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली होती. 



            श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ घातला असताना, परिसरातील चांडेवाडीत शनिवारी रात्रीत बिबटया जेरबंद करण्यात आला होता तो बिबट्या वनविभागाने ताब्यात घेतला होता. त्यानंतर रविवारी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव धनवाट परिसरातील  भारत व ईश्वर जगधने गट नंबर 98/99 या उसाच्या शेतात रविवारी (दि23),रात्री 8:30 ते 9 वाजेच्या  सुमारास मादी बिबट्या अखेर पिंजर्‍यात अडकली. वनविभागाने बिबटया रात्रीत ताब्यात घेतला असुन तीन पिल्ले वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात घेतले. दरम्यान वनअधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मदत केली. उक्कलगाव, गळनिंब, कुरणपूर,  फत्याबाद, मांडवे, एकलहरे, ममदापुर,  कडीत बु., कडीत खुर्द या प्रवरा नदीपात्राशेजारील गावातच बिबटयाचा वावर आहे. पंचक्रोशीतील नागरिक बिबट्याच्या दहशतीने भयभीत झालेले. गळनिब परिसरातील ज्ञानेश्वरी मारकड या  तीन वर्षीच्या मुलीवर नरभक्षक बिबटयाच्या हल्ल्यात ती मृत पावली होती. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी पंचक्रोशीत तळ ठोकून आहेत. 

Rajesh Borude

Previous Post Next Post