डॉ राहुल सोनवणे यांना पीएच.डी. प्रदान
नेवासा (दादा दरंदले) | तालुक्यातील घोडेगाव येथील राहुल भास्करराव सोनवणे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून रसायन शास्त्रातील संशोधनावर पीएचडी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. बाबूराव घोलप विद्यालय सांगवी पुणे येथील रसायनशास्त्र विभागातील डॉक्टर संगीता विजय जगताप यांचे त्यांना संशोधन मार्गदर्शन लाभले.
ते घोडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर राव सोनवणे यांचे चिरंजीव त्यांना मिळालेल्या पीएचडी बद्दल घोडेगाव व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.