साईकिरण टाइम्स ब्युरो
श्रीरामपुर|29फेब्रुवारी 2020| राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा नदीपाञातुन वाळु तस्कर जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उपसा करत आहे. महसूल खाते वाळू तस्करांना पाठीशी घालत आहेत. पोलिस व महसुल खात्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करावी ; अन्यथा भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस दताञय खेमनर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
महसुल खात्याने याठिकाणी छापे मारु नये म्हणून राहुरी तहसीलमधून वाळु तस्करांनी ४ दिवसाचे परमिट घेतले होते. त्या परमिट नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळु उपसा करण्यात आला. आज रोजी कुठलेही परमिट नसताना चिंचीली प्रवरा नदी पाञात आज ही दिवस राञ चोरटी वाळु वाहतूक होत असते दोन दिवसापुर्वी राहुरी तहसिलचे चार सर्कल चिंचोली नदीपाञात येऊन दोन टँक्टर व यारी पकडली पण संबंधित महसुल अधिकारी यांनी आर्थिक तडजोड करुन कुठल्याही प्रकारची कारवाई न करता परत निघुन गेले असल्याचा आरोप खेमनर यांनी केला आहे.
राहुरी महसुल कर्मचारी व पोलिस खाते याचे संबंधित वाळु तस्कारांसोबत आर्थिक लागेबांधे असुन सर्व बघता पण कारवाई करत नाही. प्रवरा नदी पाञातील अवैध वाळुउपसा बंद करावा व राहुरीचे तहसिलदार शेख यांच्या आदेशावरुन देवळाली विभागाचे सर्कल गोसावी यांनी या नदीपाञा रस्त्यावर जेसीबी साहाय्याने खड्डे खोदलेले आहे पण आता येथील खड्डे किती दिवसात बुजतात हे बघने गरजेच आहे हे खड्डे बुजुन जर वाळु वाहतुक सुरु झाल्यास जिल्ह्याधिकारी कार्यालया समोर उपोषण करणार, असे खेमनर यांनी सांगितले
Tags
ताज्या घडामोडी