नेवासा|दादा दरंदले|29 फेब्रुवारी 2020
नेवासा तालुका पंचायत समितीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला त्या वेळी बेबी केयर किटचे वाटप नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
गरोदर माता व बाळाचे आरोग्य चांगल्या प्रकारे राहण्यासाठी बेबी किट कवचकुंडल असून बेबी किटच्या माध्यमातून गरोदर मातांनी बाळाची काळजी घ्यावी असे आवाहन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलतांना केले.त्यावेळी उपस्थित नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे सौ.सुनीताताई गडाख, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार,माजी सभापती कारभारी जावळे,पंचायत समितीच्या सदस्या सौ.सविता झगरे,सौ.पार्वतीबाई जावळे,पंचायत समितीचे सदस्य विक्रम चौधरी, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी,बालविकास प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश, श्री रावस सर व आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
ताज्या घडामोडी