साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 21 फेब्रुवारी 2020
श्रीरामपूर : धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याची आढावा बैठक व धनगर समाज बांधवाचा संवाद मेळावा रविवारी २३ फेबुवारी रोजी सकाळी ११ वाजता साई पालखी निवारा शिर्डी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित राहणार आहे.

या संवाद मेळाव्यात धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी संदर्भात चर्चा व पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार कडुन धनगर समाज बांधवा उन्नती साठी १००० कोटी तरतुद केली त्यासंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच धनगर समाज संघर्ष समितीची राज्य व्यापी बैठक होणार आहे, अशी माहिती प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे व प्रदेश सचिव हरिष खूजे यांनी दिली.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील व अहमदनगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवानी मोठ्या संख्याने उपस्थित रहावे, असे अहवान धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र संघटक दताञय खेमनर, उतर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल राऊत दक्षिण नगर अध्यक्ष डि.आर. शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ रविन्द काबुडके, दिपक भागवत, श्रीरामपुर अध्यक्ष चांगदेव नजन, राहाता अध्यक्ष बाळासाहेब सापते, राहुरी अध्यक्ष जालिंदर रोडे, नगर अध्यक्ष डॉ कोळेकर, नेवासा अध्यक्ष सचिन कोळेकर, शेवगाव अध्यक्ष गणेश भिसे, संगमनेर अध्यक्ष आणासाहेब कुदनर, कोपरगांव अध्यक्ष फटांगरे, बि.के. राशिनकर, दताञय हाळनोर रंगनाथ बाहुले, सरपंच रामा पांढरे यांनी केले.
Tags
ताज्या घडामोडी