अहमदनगर जिल्हयात 20 हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक
राहुरी तालुक्यातील घटना ; महसूल कर्मचाऱ्यात खळबळ
राहुरी | साईकिरण टाइम्स ब्युरो | दि.15|अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील लाख येथील तलाठ्यास 20 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.14) अटक केली.
तलाठी परशुराम गोरक्षनाथ सूयवंशी यांनी 2 ऑगस्ट 2019 रोजी श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा ट्रॅक्टर वाळूवाहतूक करताना पकडून राहुरी तहसील कार्यालयात लावला होता. ट्रॅक्टर सोडवण्यासाठी तलाठी सूर्यवंशी यांनी ट्रॅक्टर मालकाकडे 40 हजार रुपयाची मागणी केली. तडजोड करून 20 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, ट्रॅक्टर मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. जातप गावी प्रवरा नदीजवळ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचून तलाठ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक हरीश खेडकर, पीआय शाम पवरे, दीपक करांडे, हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख, हारून शेख, अशोक रक्ताटे, पोलीस नाईक, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Tags
क्राईम