शिवसेना ओबीसी / व्हीजेएनटी श्रीरामपूर शहरप्रमुख पदी विठ्ठल गोराने यांची निवड ; बाळासाहेब भवन मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती

'बाळासाहेब भवन' मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे, सह सहचिव एकनाथ शेलार, प्रदेश उपाध्यक्ष संतोष नाथ,सुनील वंजारी यांच्या हस्ते विठ्ठल गोराने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

श्रीरामपूर : शिवसेना ओबीसी / व्हीजेएनटी श्रीरामपूर शहर प्रमुख पदी विठ्ठल गोराने यांची नुकतीच निवड करण्यात आली. 'बाळासाहेब भवन' मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे, सह सहचिव एकनाथ शेलार, प्रदेश उपाध्यक्ष संतोष नाथ, सुनील वंजारी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,  मा.नगरसेवक ॲडव्होकेट संतोष कांबळे, संजय गांधी निराधारचे शासकीय सदस्य शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय बाहुले, शिवसेना तालुका प्रमुख संतोष डहाळे, सागर कुदळे, विशाल दुर्गे, संभाजी देवकर, निलेश शिंदे, राजेश वाव्हळ, राजेश बोरुडे, बापूराव नवले पाटील, राहुल शेवाळे, सुरज साळवे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post