श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय समोरील दलित वस्ती मध्ये लाखो रुपये खर्च करून नुकतेच बसविलेले पेव्हिंग ब्लॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, ठेकेदाराला हाताशी धरून प्रशासनाने लाखो रुपये खर्च दाखवून स्वस्तात मस्त केलेले काम उघड झाले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते निलेशराव लांडे पाटील प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्लेविन ब्लॉक बसवत असताना कोणत्याही प्रकारची कच व लागणारे इतर सामग्री वापरण्यात न आल्यामुळे या रोडचे दोनच महिन्यात बारा वाजलेले आहे. या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे रोड खराब होऊन प्लेविग ब्लॉक निघालेत आहेत. सदरचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आलेली नाही. केलेला रस्त्याचा खर्चाचा कोणताही माहिती फलक बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला नाही. रस्त्याच्या साईडने पूर्णता रस्ता उघडलेला आहे साईट पट्टी भरण्यासाठी जो मुरूम वापरण्यात येतो तोही मुरूम त्या कामासाठी वापरलेला नाही.
या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते निलेशराव लांडे पाटील हे अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे संपूर्ण रस्त्याची पडताळणी होण्याबाबत निवेदन देणार आहेत व चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाईची मागणी याद्वारे करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.