लोकप्रतिनिधींवर बरसले अतिक्रमणग्रस्त नागरिक; पुनर्वसन न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा


श्रीरामपूर : निवडणुका आल्या की सर्व पुढाऱ्यांना आमची आठवण येते. आमच्यावर संकट आल्यावर मात्र कोणीही मदतीला धावून येत नाही. आज शेकडो कुटुंब निराधार झाली, व्यवसाय उद्धवस्त झाले. त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्या, घरांचे पुनर्वसन करून द्या, अन्यथा येणाऱ्या पालिका निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू असा इशारा देत गोंधवणी रोडवरील संतप्त पिडित, आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यावर बरसले.

पालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांवर बुलडोझर चालविल्यानंतर शेकडो कुटुंब उघड्यावर आली. त्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेविका प्रणिती चव्हाण व दिपक चव्हाण यांनी आमदार ओगले, ससाणे यांच्या उपस्थितीत गोंधवणी रोड यथे बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित पिडितांच्या भावनांचा बांध फुटला.


पालिका झाली आता पाटबंधारे विभागही आमच्या मागे हात धुवून लागला आहे. आम्ही गरिबांनी तुम्हाला निवडून दिले. तुम्हीच आमच्याकडे पाठ फिरवली तर आम्ही कोणाकडे जायचे. असे म्हणत अनेक महिलांना अश्रु अनावर झाले. आजपर्यंत आम्ही सर्व सामान्य नागरिक कोणालाही काही बोलत नव्हतो. पुढाऱ्यांपासून अधिकारी सर्वांनाच सहकार्य करीत आलो आहोत. मग आमच्यावरच अन्याय का? आम्ही आता कुठे जायचे? असा सवाल अनेकांनी विचारला.

या सर्व पिडितांचे पुणर्वसन करता येऊ शकते. गोंधवणी रोड येथे टपाल विभागाची जुणी वसाहत आहे. तेथे शेकडो घरे पडून आहेत. आमदारांनी प्रयत्न करून तेथे या पिडितांची तात्पुरती व्यवस्था करावी. याशिवाय या वसाहती शेजारीही मोठ्या प्रमाणात सरकारी जागा आहे. याठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करता येईल असेही सुचविले. गोंधवणी रोड ८० ऐवजी ६० फुटाचा करण्याबाबत पालिका निवडणुकीनंतर पहिला ठराव करण्याचा प्रस्तावही यावेळी दिपक चव्हान यांनी मांडला.
आमदार ओगले म्हणाले, प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा मी जाहीर निषेध करतो. माहिती मिळताच मी तातडीने जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो मात्र त्यांनी हस्तक्षेप केला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही पत्र पाठविले त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची खुर्ची वाचाविण्यासाठी ही कारवा केली. जनता जगली तर सरकार जगेल. झालं तेवढं भरपूर झाल. सरकारने आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला.
इंदिरा गांधी मंगल कार्यालयामध्ये महिलांना राहता येईल का, यासंबंधी मुख्याधिकारी यांच्याची चर्चा करणार आहे. सर्वांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणा ससाणे म्हणाले, नोटीसा नसताना ही कारवाई केली. हा सर्वांवर अन्याय आहे. भयान परिस्थीती सर्वांवर ओढावली आहे. स्व. जयंत ससाणे हे सतत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांच्या शिकवणीनुसार सर्व अन्याग्रस्तांच्या पाठिमागे आपण खंबिरपणे उभे आहोत. आमदारांनी पालकमंत्र्यांसमोर आपली कैफीयत मांडावी, असे ते म्हणाले. यावेळी सचिन गुजर, भारत कुंकुलोळ आदींची भाषणे झाली. गौतम उपाध्ये, रमा धिवर, पुरूषोत्तम झंवर, रोहित शिंदे आदींसह अतिक्रमण ग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post