श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) : नुकत्याच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५० वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये आझाद क्रीडा मंडळचा खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे.
उत्तराखंड येथे होणार अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वी कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जयंत काळे महाराष्ट्र संघामध्ये आपल्या खेळाची चमक दाखवणार आहे.सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गेली २ ते ३ वर्षापासून तो टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डीचा सराव करत आहे.
जयंत हा वाकडी येथील प्रगतशील शेतकरी श्री हरिभाऊ विठ्ठल काळे यांचा नातू व बाळासाहेब हरिभाऊ काळे यांचा चिरंजीव आहे.कबड्डी खेळाचे तज्ञ प्रशिक्षक रवींद्र गाढे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.निवड झाल्याबद्दल त्याचे व्यवस्थापक अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व टाकळीभान येथील पदाधिकारी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.