श्रीरामपुरातील अतिक्रमण ३० फुटापर्यंतच काढा ; सर्व दुकानदारांना पर्यायी जागा देऊन अर्थिक मदत करा ; मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे


श्रीरामपूर
: श्रीरामपूर शहरात चालू असलेले अतिक्रमण 50 फूट न करता 30 फुटापर्यंतच अतिक्रमण काढावे व दुकानदारांना पर्यायी जागा देऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासक  व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, श्रीरामपूर शहरात दि. २८/१/२०२५ रोजी पासून सुरु असलेल्या अतिक्रमण काढण्याची मोहित त्वरीत स्थगित करण्यात यावे  कारण असे की, यापैकी अनेक व्यवसायिक  ५० ते ६० वर्षापासून तर काही ३० ते ४० वर्षापासून व्यवसाय करुन तुटपुंजा पैशात व उदरनिर्वाह चालवित आहे. अशा पद्धतीने  अचानक त्यांची रोजीरोटी बंद झालेतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. व अनेकांचे याच व्यवसायावर मुलांचे शिक्षण  तसेच काहींचे लग्न कार्य, घर कर्ज व व्यावसायिक कर्ज याचे हप्ते त्यांच्याकडून फेडणे अशक्य होणार असल्याने त्यांच्यावर कर्जाचे डोंगर कोसळणार असल्याने यानंतर त्यांच्यावर पोलिस कारवाई होऊन कोर्ट, कचेरी, संकट संकट येणार आहे, अशा संकटाला काहींची सामोरे जाण्याची मानसिकता नाही. त्यामुळे सदर दुकानदार मानसिक तणाव घेऊन विविध व्यसनाधीन होऊन त्यांचे प्रपंच उघड्यावर पडल्याशिवाय राहणार नाही व यापैकी काहीजण आत्महत्या करण्यासारखे पर्याय निवडू शकतात असे अनेक व्यवसायिक आम्हाला भेटून सांगत आहे. अतिक्रमणामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट ओढलेले आहे या गंभीर परिस्थितीची आपण त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त सर्व दुकानदारांना पर्यायी जागा देण्यात यावी.  शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी. महाराष्ट्र शासन व वरिष्ठ प्रशासनाकडे या सर्व व्यवसायिकांचे व्यथा मांडून यांना न्याय मिळवून द्यावा.  तसेच स्थगित करणे शक्य नसेल तर संबंधित सर्व दुकानदारांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन
सर्व दुकानदार ज्यावेळेस नगरपरिषद जागेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली त्यावेळेस आपल्या नगरपरिषद अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचेशी आर्थिक तडजोड करुन त्यांना दुकान बांधण्यास सहकार्य केले व अतिक्रमण नाही असे नगरपरिषद वरिष्ठ अधिकार्यांना भासवून नेहमीच दिशाभूल करुन स्वत:चे खिशे भरण्याचे काम केलेले आहे. तसेच हेच अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी रस्त्यात हातगाडी तसेच पथविक्रेते यांच्याकडून सुद्धा चिरीमिरी घेऊन त्यांना त्याच जागेवर म्हणजेच मेनरोडच्या राममंदिर चौक, व वाचनालयासमोर, व इतर महत्वाच्या गजबजीत ठिकाणी व महत्वाच्या दळणवळणच्या ठिकाणी प्रस्तातिपत केले आहे. प्रथमत: अतिक्रमण विभागातीय सर्व अधिकारी, कर्मचारी, शिपाई यांचेवर कडक कारवाई करुन त्यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे. म्हणजे यापुढे श्रीरामपूर शहरात अतिक्रमण होणार नाही. हेच अतिक्रमण अधिकारी गेल्या १५ ते २० वर्षापासून येथेचे अतिक्रमण विभागामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांना प्रत्येक भागातील नागरीक ओळखीचे झालेत व त्यामध्ये हितसंबंध तयार होऊन त्यांना नगरपरिषकेच्या मोकळ्या जागेमध्ये छोट्यामोठ्या टपऱ्या टाकून देऊन स्वत:चे खिशे भरण्ययाचे काम केले आहे. व तक्रार झाल्यावर तेथे अतिक्रमण नाही असे तोंडी वरिष्ठ अधिकार्यांना सांगुन त्यांची दिशा भूल करण्यात येते.
श्रीरामपूर शहरात बिल्डर लॉबी व पैशेवाले मोठे व्यवसायिक, दुकानदार यांनी  नगरपरिषद बांधकाम विभागाला बांधकाम परवानगी घेत असतांना पार्किंगची जागा कागदोपत्री दाखवून कंम्पलीशन सर्टिफिकेट घेतलेले आहे. व प्रत्यक्षात पार्किंगच्या ठिकाणी गाळे बांधून विक्री केले व काहींनी भाडेतत्वार दिले. अशा पार्किंगची व्यवस्था न करणार्या व अधिकार्यांची शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करणाऱ्या सर्वांवर कारवाई करुन पार्किंग साठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. यापूर्वी देखील अतिक्रमणाबाबत अनेक नागरीकांनी तक्रारी केलेल्या आहेत. व त्यांना आजपर्यंत न्याय आपल्याकडून कोणत्याही स्वरुपाचे न्याय भेटलेले नाही. अशा तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीचे सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी.
आमच्या निवेदनाची दखल घेऊन सखोल चौकशी करुन आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा आपण पण या भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालत आहे, असे समजून आपल्यावर कार्यवाही व्हावी, यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाबासाहेब शिंदे मनसे,जिल्हाध्यक्ष डॉ. संजय नवथर उपजिल्हाध्यक्ष अमोल साबणे तालुकाध्यक्ष सतिष कुदळे शहराध्यक्ष विलास पाटणीमनसे तालुका संघटक, ता. अध्यक्ष कामगार सेना भास्कर सरोदे मनसे तालुका सचिव,ता. अध्यक्ष रोजगार सेना निलेश सोनवणे मनसे शहर संघटक,ता.अध्यक्ष, सहकार सेना अमोल वडितके मनसे तालुका सरचिटणीस,ता. अध्यक्ष वाहतूक सेना नितीन जाधव ता. अध्यक्ष रस्ते आस्थापना संकेत शेलार उपजिल्हाध्यक्ष, मनविसे,
अतुल खरात तालुकाध्यक्ष, मनविसेसंदीप विश्वंभर शहर उपाध्यक्ष मारुती शिंदे शहर उपाध्यक्ष अक्षय काळे संतोष आवटी किशोर शिंदे अर्जुन भोसले सुरेश नागरे समीर सय्यद बजरंग गायकवाड किरण सोनवणे किरण वायकेंडे आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post