श्रीरामपूर नगरपालिका शाळा क्र.३ च्या विद्यार्थ्यांची नाटिकेतून 'संविधानाची जनजागृती' : ७६ वा 'प्रजासत्ताक दिन' उत्साहात साजरा


श्रीरामपूर : गोंधवणी येथील नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या प्रांगणात ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करून मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेल्या लेझीम नृत्य आणि 'जागृतता संविधानाची' या सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली.

माजी आ. भाऊसाहेब कांबळे, भैरवनाथनगरच्या सरपंच दिपाली फरगडे, 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, खादी ग्रामउद्योग संस्थेचे संचालक प्रविण फरगडे, मुख्याध्यापिका स्मिता साळवे, शिक्षक राजू गायकवाड, सचिन डोखे, प्राची लोळगे, पल्लवी बोरुडे, सेवानिवृत्त शिक्षक श्री अकोलकर, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. 'जण गण मन' राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.


यावेळी पदवीधर मतदार संघांचे माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतुन व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघांचे आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून वाटप केलेल्या संगणक संचाचे लोकार्पण सरपंच दिपाली फरगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

श्रीरामपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिका शाळा क्रमांक 3 च्या विदयार्थ्यांनी 'संविधानाची जागृतता' या नाटिकेद्वारे जागृती केली.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्य केले व राज्यघटनेचे महत्व अधोरेखित करणारे 'संविधानाची जागृतता' हे नाटक सादर केले. शाळेतील मुलांनी भाषणातून राज्यघटना व गणराज्य दिनाचे महत्व सांगितले. . शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. मुलांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. ध्वजस्तंभासमोर सुंदर रांगोळीचे रेखाटन करण्यात आले होते. पालकांच्या सहयोगातुन मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आ. भाऊसाहेब कांबळे, 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सरपंच दिपाली फरगडे यांनी संविधान व प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजू गायकवाड यांनी केले. आभार मुख्याध्यपिका स्मिता साळवे यांनी मानले. शिक्षिका प्राची लोळगे, सचिन डोखे, पल्लवी बोरुडे यांच्यासह पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post