ध्येय निश्चित करून मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते- कृष्णाजी भगत यांचे प्रतिपादन; दानशूर व्यक्तींच्या मदतीतून जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व दप्तराचे वाटप


सिन्नर ( प्रतिनिधी ) : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते.दानशूर व्यक्तींनी केलेल्या दानांतून एक अतिशय चांगला व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून संस्था ,गाव व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन मविप्र संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांनी केले. 

       डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गणवेश व शालेय दप्तर वाटपप्रसंगी ते  बोलत होते.भगत पुढे म्हणाले की,कर्मवीरांनी लावलेल्या छोटयाशा वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्था विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबवित असते.गावातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळे च शाळेची इमारत उभी आहे.

             व्यासपीठावर मविप्र संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत,शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने,शालेय समितीचे सदस्य दामोदर कुंदे,वसंतराव जाधव, माजी सरपंच शरद माळी, रामनाथ पावसे,पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगसे,अर्चना ढोली, चित्राताई

पडवळ मुख्याध्यापक रामदास वाजे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीदेवी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व दप्तराचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध शालेय उपक्रम तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाच्या वतीने संचालक कृष्णाजी भगत तसेच येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबदल नारायण वाजे यांचा सत्कार करण्यात आला.

       विद्यालयातील सर्व शिक्षक,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने, अभियंता भालचंद्र  वारुंगसे,संदेश वाजे,महेश वारुंगसे व त्यांचे मित्रमंडळ आदींच्या वतीने ७५ शालेय गणवेश  तसेच दानशूर माजी विद्यार्थी  अनिल आव्हाड, उद्योजक बंटी कटारिया ,अतुल अग्रवाल दातृत्वातून  ५० शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. शालेय गणवेश व दप्तर मिळविण्यासाठी विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक पी.आर.करपे व विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी परिश्रम घेतले.दरवर्षी मदतीचा हात हा उपक्रम राबविण्यात येतो.

           विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी रवि गोजरे व किशोर शिंदे यांनी विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाही ४०  विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा काढला आहे. या सर्व उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी तर आभार सुषमा थोरात यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनिल ससाणे,सोमनाथ गिरी,सोमनाथ पगार,शिवनाथ हुजरे आदींसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post