पॅरिस न्यूज ( गौरव डेंगळे) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजीच्या रँकिंग फेरीला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.या फेरीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.त्याने १९८३ गुण मिळवले.संघाने थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या फेरीत कोरियाने ऑलिम्पिक विक्रम मोडला व २०४६ गुणांसह पहिले स्थान मिळवले.चीन (१९९६ गुण) दुसऱ्या तर मेक्सिको (१९८६ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय तिरंदाज अंकिताने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली असून,ती ६६६ गुणांसह ११व्या क्रमांकावर आहे.भजन ६५९ गुणांसह २२ व्या व दीपिका कुमारी ६५८ गुणांसह २३ व्या स्थानावर आहे.या तिघांना ६४ ची फेरी खेळावी लागणार आहे.
पुरुष गटाची पात्रता फेरी सुरू झाली आहे.या गुणांच्या आधारे पुरुष आणि मिश्र संघाचा ड्रॉ काढण्यात येईल.३६ शॉट्सनंतर,भारतीय संघ ६ व्या स्थानावर राहिला, मिश्रित ७ व्या स्थानावर आहे.
Tags
खेळ