श्रीरामपूर ते डोमेगाव ४२ वी पायी यात्रा उत्साहात


श्रीरामपूर : येथील गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा श्रीरामपूर ते तालुक्यातील डोमगेगाव येथील बिरदबाबा गुरुवारा अशी पायी यात्रा उत्साहात संपन्न झाली. हे पायी यात्रेचे ४२ वर्ष होते. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी भाविकांनी पायी यात्रेत मोठ्या संख्येनेस सहभाग घेतला.

 रविवार, दि.२१  जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता पायी यात्रेला सुरुवात झाली दुपारी डोमेगाव येथील गुरुद्वारामध्ये पोहोचले. रस्त्यात ठिकठिकाणी यात्रेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले व चहापाणी तसेच नाश्ता झाला. डोमागेगाव येथे ग्यानी अनोखसिंग मस्कीन व भाई मनप्रितसिंग यांचे किर्तन झाले. सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत अरदास, दिवान की समाप्ती आदी कार्यक्रम झाले. 

शेवटी भंडारा महाप्रसाद (लंगर) वाटण्यात आला. या कार्यक्रमास यात्रेतील भाविकांसह डोमेगाव व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. यात्रा यशस्वीतेसाठी तमन भटियाणी,अनगड धूपड, सीडक सेठी, अनमोल भटियाणी, सिमरन बत्रा, किशोर छतवाणी, जतिन बजाज, मच्छी ठकराल, विकी चुग, देवेन ठकराल आदींनी सहभाग घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post